आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर : मिड-डे मिलचा 19 पोती तांदूळ गाडला, मुख्याध्यापिका अटकेत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - मुलांच्या मध्यान्ह भोजनासाठी आलेला 19 पोती तांदूळ शाळेच्या मुख्याध्यापिकेने जमिनीत गाडून ठेवला होता. तो आज हुडकून काढण्यात आला. याप्रकरणी मोतीबाग येथील भोला हायस्कूलच्या मुख्याध्यापिका कुमुदिनी नंदेश्वर यांच्याविरुद्ध पाचपावली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, त्यांना अटक केली आहे.
(धुळ्यात रेशनचा तांदूळ गुजरातकडे नेताना जप्त)
शाळेची दोन मुले नगरसेवक संदीप सहारे यांच्याकडे कागदपत्रांवर त्यांच्या सहय़ा घेण्यासाठी गेली असता सहारे यांनी त्यांना खिचडी मिळते का, असे विचारले. तेव्हा त्यांनी आठ महिन्यांपासून खिचडी मिळत नसल्याचे सांगितले.

सहारे यांनी लगेच पाचपावली परिसराचे सहायक पोलिस आयुक्त बाबा डोंगरे यांच्याशी संपर्क साधला. ते मुलांसोबत शाळेत आले. तेवढय़ात सहायक पोलिस आयुक्त बाबा डोंगरे, ठाणेदार प्रकाश बेले यांच्यासह शाळेत आले. मुख्याध्यापिका नंदेश्वर यांना विचारणा केली असता तांदूळ खराब झाल्यामुळे जमिनीत गाडल्याचे सांगितले. पोलिसांनी जेसीबीच्या साहाय्याने नऊ पोती तांदूळ बाहेर काढला. अंधार झाल्यामुळे उर्वरित पोती तांदूळ उद्या, गुरुवार 5 रोजी काढण्यात येणार आहे. पोलिसांनी तांदूळ तपासण्यासाठी अन्न व औषधी प्रशासनाच्या अधिकार्‍यांना बोलावले. त्यांनी तांदळाचे नमुने तपासणीसाठी घेतले. हे प्रकरण गंभीर असल्याने शाळेचे संचालक मंडळविरुद्ध कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले. तांदळाची पोती आठ फूट खोल खड्डय़ात टाकून माती व रेतीने खड्डा बुजवण्यात आला होता.