आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैन्य भरती पेपरफूटप्रकरणी नागपुरात सीबीआयच्या धाडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - सैन्य भरती पेपरफूटप्रकरणी सीबीआयच्या तीन पथकांनी बुधवारी सैन्य भरती कार्यालयासह पाच ठिकाणी धाडी टाकून चौकशी केली. त्यामुळे संबंधितांचे धाबे दणाणले आहे. यापूर्वी 3 फेब्रुवारीला सीबीआयने धाड घातली होती.

या प्रकरणात किमान 70 परीक्षार्थ्यांकडून प्रत्येकी एक ते दीड लाख रुपये घेऊन त्यांना परीक्षेच्या आधीच उत्तरे पुरवण्यात आल्याच्या संशयावरून सीबीआयने कारवाई केली होती. 3 फेब्रुवारीला सैन्यातील ज्युनियर ड्यूटी क्लार्क, ज्युनियर ड्यूटी सोल्जर व ज्युनियर ड्यूटी टेक्निकल स्टाफ पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत पेपर फुटल्याची तक्रार सीबीआयला प्राप्त झाली होती. त्याची खातरजमा करण्यासाठी सीबीआयने नागपूर केंद्रावर छापा घालून संपूर्ण विद्यार्थ्यांची कसून चौकशी केली असता सहा विद्यार्थ्यांच्या मोबाइल मेसेजमध्ये प्रश्नांची उत्तरे आधीच पाठवल्याचे स्पष्ट झाले.

दोन जण ताब्यात
नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे टँगो चार्ली सैन्य प्रशिक्षण केंद्र चालवणार्‍या जयकुमार बेलखेडे याला अटक करण्यात आली होती. नंतर त्याची जामिनावर सुटका झाली. बुधवारी सीबीआयच्या पथकांनी सैन्य भरती कार्यालयासह वसाहतीतील दोन निवासस्थानांसह महेंद्रनगर व गोंदिया येथे धाड घातली. सीबीआयने चौकशीसाठी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची नावे कळू शकली नाही.