आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MLA Agitating For The Regulrise Illegal Construction In Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवडमधील बेकायदा बांधकाम नियमित करण्‍यासाठी आमदारांचे आंदोलन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील विनापरवाना बांधकाम नियमित करण्याच्या मागणीसाठी सर्व पक्षीय आमदारांनी मंगळवारी सकाळी विधानसभेच्या पायर्‍यांवर आंदोलन केले. विधानसभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी आमदार विलास लांडे, बापू पठारे, लक्ष्मण जगताप आणि अण्णा बन्सोडे, नीलम गोर्‍हे यांच्यासह सर्वपक्षीय आमदारांनी विधान भवनाच्या पायर्‍यांवर एकत्र येऊन शासनाविरुद्ध नारेबाजी केली. पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत हजारो विनापरवाना बांधकाम करण्यात आले. बांधकाम होत असताना शासन मूग गिळून होते. परंतु, या घरांवर शासन बुलडोजर चालवण्याच्या तयारीत असून, त्यामुळे लाखो नागरिक बेघर होतील. नागरिकांच्या हितासाठी ही बांधकामे नियमित करण्याची मागणी सर्वपक्षीय आमदारांनी लावून धरली आहे.
घोषणाबाजीनंतर आमदारांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना भेटले. याच मुद्यावरून राष्ट्रवादीच्या चार आमदारांनी राजीनामा दिला होता. हा प्रश्‍न केवळ पिंपरी चिंचवडपुरता र्मयादित नसून, अशा बांधकामांच्या संदर्भात कायदा तयार करण्याच्या दृष्टीने काम सुरू असल्याचे हर्षवर्धन पाटील म्हणाले.