आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार जाधव पोहोचले ठाण्यात, मारहाण प्रकरणी पोलिस ठाण्यात नोंदवला जबाब

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - पोलिस निरीक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव हे अडचणीत सापडले आहेत. नागपूर सत्र न्यायालयाने त्यांना अटक होण्यापासून संरक्षण दिले असले तरी शनिवारी ते सोनेगाव पोलिस ठाण्यात पोहोचले.

सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्जात त्यांनी पोलिसांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्याची हमी दिली होती. त्यानुसार शनिवारी दुपारी १२.१५ वाजता सोनेगाव पोलिस ठाण्यात दाखल झाले. या वेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक पी. शहा यांच्या उपस्थितीत जवळपास अर्धा तास त्यांचा जबाब नोंदवला. जबाबात त्यांनी सांगितले की, २०११ मध्ये काही पोलिस अधिका-यांनी आपल्याला एका बंद खोलीत नेऊन मारले होते. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महासंचालकांना तपास करून दोषी अधिका-यांवर कारवाई करण्याचे निर्देश काही दिवसांपूर्वीच दिले.

त्या प्रकरणातील बडे अधिकारी तक्रारदार पोलिस निरीक्षक पराग जाधव यांच्या ओळखीचे आहेत. जुन्या प्रकरणाचा त्यांच्यावर प्रभाव असून, बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नागपुरात आले होते. त्यांनी शिवसेना आमदारांची बैठक सायंकाळी ६ वाजता हॉटेल प्राइड येथे बोलावली होती.

या बैठकीला हजर राहण्यासाठी आपण हॉटेल प्राइडमध्ये गेलाे होतो. बैठकीच्या सभागृहात प्रवेश करताना एका व्यक्तीने आपला मार्ग अडवला असता त्याच्याशी आपली बाचाबाची झाली. यानंतर रस्ता अडवणारा व्यक्ती हे तक्रारदार पोलिस निरीक्षक पराग जाधव असल्याचे समजले. त्यांनी आपल्याविरुद्ध खोटी तक्रार दिली असून, असा कोणताही प्रकार त्या दिवशी घडला नाही, असे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या जबाबात म्हटले आहे.