आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार हर्षवर्धन जाधवांनी लगावली पोलिस निरीक्षकाच्या कानशिलात, गुन्हा दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - कन्नड येथील शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी नागपुरातील हॉटेल प्राइड येथे बुधवारी रात्री विशेष सुरक्षा पथकातील पोलिस निरीक्षक पराग जाधव यांना धक्काबुकी करून कानशिलात लगावली.
याप्रकरणी जाधव यांच्यावर सोनेगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक ए. बी. पाटील यांनी सांगितले की, बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नागपुरात आले होते. जाधव त्यांना भेटण्यासाठी हॉटेलात गेले होते. या वेळी त्यांची पीआय जाधव यांच्याशी बाचाबाची झाली. त्यानंतर हर्षवर्धन जाधव यांनी पराग जाधव यांना धक्काबुकी करत त्यांना मारहाण केली. पराग जाधव नागपूर येथे अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी आले आहेत. दरम्यान, हर्षवर्धन जाधव यांना गुरुवारी अटक होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पुढील स्लाइडमध्ये, 2011मधील मारहाण प्रकरणी कालच दिले चौकशीचे आदेश