आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार विजय खडसेंसह चार जण गंभीर जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उमरखेड (जि. यवतमाळ) - समोरून येणार्‍या दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटून आमदार विजय खडसे यांचे वाहन उलटले. या अपघातात एक जण ठार, तर आमदार विजय खडसे यांच्यासह चार जण गंभीर जखमी झाले.

ही घटना उमरखेड-नांदेड मार्गावर शहरापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या वनविभागाच्या नाक्याजवळ रविवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली.

डॉ. दशरथ वानखेडे (40 रा. सुकळी) असे मृताचे नाव आहे. ते युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष होते. आमदार विजय खडसे स्कॉर्पिओ गाडीने नांदेडला निघाले होते. त्यांच्यासोबत डॉ. दशरथ वानखेडे, सामाजिक कार्यकर्ते संतोष गवळे, युवक काँग्रेसचे सचिव शिवाजी वानखेडे, त्यांच्या आई गोदावरी वानखेडे आणि चालक आहुटे हे होते. शहरापासून काही अंतरावर येताच समोरून येणार्‍या दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून गाडी उलटली.