आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • MLA Yashomati Thakur In Trouble In The Connection With Ilegal Electricity

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अवैध वीज पुरवठाप्रकरणी आमदार यशोमती ठाकूर अडचणीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - आमदार यशोमती ठाकूर यांच्या उपोषण मंडपास सेतू कार्यालयातून अवैध वीजपुरवठा दिला होता. या प्रकरणाची चौकशी होणार असल्याने आमदार अडचणीत सापडल्या आहेत. कार्यकारी अभियंता बी. एस. राठोड हे या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करतील.


पुनर्वसन निधीच्या मागणीसाठी 14 ऑगस्टला उपोषण करणार्‍या काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या मंडपाला सरकारी इमारतीतूनच वीजपुरवठा करण्यात आल्याची धक्कादायक बाब ‘दिव्य मराठी’ने उघडकीस आणली होती. वीज घेण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या सेतूचे संचालक महेंद्र देशमुख यांच्याकडून परवानगी घेतली असल्याचे यशोमती ठाकूर यांचे म्हणणे आहे. असे असले तरी इमारत परिसराच्या बाहेर अन्य ठिकाणी वीजपुरवठा देणे गैरकायदेशीर असल्याचे वीज वितरण कंपनीचे म्हणणे आहे.


18 तास सुरू होती वीज
उपोषण मंडपात 500 वॅट क्षमतेचे चार हॅलोजन दिवे लावण्यात आले होते. हे चार दिवे सायंकाळी 6:30 वाजेपासून दुसर्‍या दिवशी दुपारी 12 वाजेपर्यंत सुरू होते. याकरिता 36 युनिट सरकारी वीज खर्च झाली.