आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनसेकडून ‘इंडियाबुल्स’ची तोडफोड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - रविवारच्या जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इंडियाबुल्स कंपनीला विरोध करण्याचे आदेश देताच त्याचे पडसाद राज्यात उमटू लागले आहेत. रविवारी रात्रीच मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील परळ भागात असलेल्या कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली. त्यापाठोपाठ सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास अमरावतीतील जिल्हा सत्र न्यायालयाच्या शेजारीच असलेल्या इंडियाबुल्स कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली.
याप्रकरणी गाडगेनगर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवण्यात आली आहे. अमरावती बाजार समितीतही कार्यकर्त्यांनी दगडफेक करून परप्रांतीयांच्या दुकानांना लक्ष्य केले होते.


दरम्यान, मुंबईतील तोडफोडप्रकरणी सोमवारी पाच कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. शेतक-यांच्या हक्काचे पाणी या कंपनीला दिले जात असल्याने त्याविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन राज यांनी केले होते.