आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपूर- मनसेच्या कार्यकर्त्यांनी विदर्भातही चक्का जाम करत एसटी बसेसची तोडफोड केली. नागपूर जिल्ह्यातील काटोल, वाडी, पारडी, उमरेड रोडवरील टोल बूथवर मनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. भंडारा व गोंदिया जिल्ह्यांतही राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करण्यात आले. अकोला जिल्ह्यात रास्ता रोको तर बुलडाण्यात बसवर दगडफेक केली, तर जिल्ह्यातील जळगाव जामोद, बुलडाणा, सिंदखेडराजा, चिखली, मलकापूर, मोताळा, खामगाव, शेगाव, देऊळगावराजा आदी ठिकाणी आंदोलन करण्यात आले. वाशीम जिल्ह्यात केशवनगर (ता. रिसोड) येथे एसटी बसच्या काचा फोडल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.