आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • MNS Now Standing Its Candidate In 48 Loksabha Consituncies

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लोकसभेच्या 48 जागा लढवण्याचा मनसेचा प्रयत्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यातील 48 जागांवर उमेदवार उभे करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. राज्याच्या सर्वच लोकसभा मतदारसंघांत पक्षाने उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. सर्वच जिल्हा कार्यकारिणीत बदल करण्यासाठी प्राथमिक फेरी सुरू झाली असून, पहिल्या टप्प्यात विद्यमान कार्यकारिणी बदलून नवी कार्यकारिणी तयार करण्यात येणार आहे.

आमदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली उत्तर महाराष्ट्र आणि ठाणे, आमदार नितीन सरदेसाई यांच्या नेतृत्वात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र, आमदार बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वात मराठवाडा आणि अरविंद गावडे यांच्या नेतृत्वात विदर्भात संघटना बांधणी केली जात आहे. विदर्भाची जबाबदारी असलेली चार जणांचा चमू शुक्रवारी अमरावतीत येऊन गेला. त्यांनी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केली.

लोकसभा निवडणुकीची तयारी करतानाच 2014 मध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकीचीही तयारी करण्याचे मनसेचे दुहेरी लक्ष्य आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या कार्यकारिणीमधील मरगळ दूर करून कार्यकर्त्यांची नव्याने जुळवाजुळव आणि पक्षबांधणी, असे दोन प्रमुख कार्यक्रम पक्षाने घेतल्याचे मनसेचे सरचिटणीस अतुल चांडक यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. पक्षाची बांधणी योग्यरीतीने होत आहे की नाही याचा आढावा घेण्यासाठी मनसेच्या राज्य पदाधिकार्‍यांच्या पथकने संघटनात्मक बांधणीसाठी राज्याचा दौरा करत आहे, असे त्यांनी सांगितले.