नागपूर - व्यसनमुक्ती पंधरवडा सुरू असताना राज्यात थर्टीफर्स्टला दारूची दुकाने रात्रभर सुरू ठेवण्याची मुभा देण्याच्या सरकारच्या निर्णयास सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे यांनी रविवारी विरोध केला. हा निर्णय मागे घेण्यात यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे त्यांनी सांगितले.
उत्पादन शुल्क मंत्री गणेश नाईक यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. तेव्हा निर्णय गृह विभागाचा असल्याचे समजले. गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे राज्यमंत्री सतेज पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यांनी निर्णयाची कल्पना नसल्याचे सांगितले, असे मोघे म्हणाले.