आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Monitoring Plan For Tiger Security At Nagpur Forest

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ताडोबासह जंगलातील वाघांच्या सुरक्षेसाठी आता 'मॉनिटरिंग प्लॅन'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- गेल्या काही महिन्यांत शिकार्‍यांनी ताडोबासह शेजारच्या जंगलात धुडगूस घालून वाघांना लक्ष्य केले. त्यामुळे शिकार्‍यांचा बंदोबस्त करण्‍यासाठी वनविभागाकडून ठोस पावले उचलली जात आहे. वाघांच्या सुरक्षेसाठी लवकरच मॉनिटरिंग प्लॅन' तयार केला जाणार आहे. भविष्यातील अशा घटना रोखण्यासाठी आता वन परिक्षेत्र अधिकार्‍यांना 'मॉनिटरिंग प्लॅन' तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
यात ताडोबा टायगर रिझर्व्ह क्षेत्र वगळता मध्य चांदा (प्रादेशिक), ब्रह्मपुरी व वन विकास महामंडळाच्या अधिकार्‍यांना त्यांच्या कार्यक्षेत्रासाठी हा प्लॅन तयार करण्यास लवकरच सुरुवात होणार आहे. याशिवाय नवीन वॉच टॉवर उभारले जाणार आहे. तसेच प्रवेशद्वार तयार करणे, गस्ती आणि वॉटर होलची संख्या वाढविणे आदी सुविधाही केल्या जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.