आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्‍काळाच्या झळा: राज्यातील दुष्काळी गावांत आणखी ५७०० गावांची भर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारकडून केंद्र सरकारला मदतीसंदर्भातील मागणी करणारे सुधारित निवेदन पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत दिली.

यापूर्वी ३९२५ कोटींच्या मदतीची याचना करणारे निवेदन पाठवण्यात आले होते. यापूर्वी राज्यातील १९ हजार गावे दुष्काळग्रस्त होती. मात्र, आता या गावांमध्ये ५७०० गावांची वाढ झाली आहे. या नव्या प्रस्तावामुळे केंद्राकडे मागितलेल्या निधीत वाढ होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, दुष्काळी परिस्थितीबाबत राज्याने आतापर्यंत केलेल्या उपाययोजनांचे केंद्रीय पथकाने कौतुक केले. या परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्राकडून राज्याला भरीव मदत देण्याच्या बाबतीत पथकाची सकारात्मक भूमिका असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सध्या पाणी आणि चाराटंचाई नाही; मात्र भविष्यात चारा व पाणीटंचाईच्या उपाययोजना करण्यासाठीदेखील केंद्राची मदत महाराष्ट्राला देण्याची हमी पथकाने दिली, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

दुष्काळ गंभीरच
प्रवेश शर्मा यांच्या नेतृत्वात केंद्रीय पथकाने मागील चार दिवसांत १४ जिल्ह्यांत दुष्काळी गावांची पाहणी केली. राज्यात दुष्काळी भागाची परिस्थिती गंभीर असल्याचे केंद्रीय पथकाने मान्य केले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.