आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mother In Law Complaining Against Her Dauther In Law In Police Station

आमदार सूनबाईविरुद्ध सासूची पोलिसांत तक्रार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ - आमदार नीलेश पारवेकर यांच्या निधनानंतर सुरू झालेला पारवेकर कुटुंबातील वाद पोलिसांपर्यंत पोहोचला आहे. नीलेश यांच्या आई कांताबाई यांनी सोमवारी सूनबाई आमदार नंदिनी पारवेकर यांच्याविरोधात तक्रार दिली आहे.


नीलेश यांच्या अपघाती निधनानंतर कांताबाई यांना मुलगा योगेशला पोटनिवडणुकीत उतरवण्याची इच्छा होती. कॉँग्रेसने नंदिनी यांना उमेदवारी दिली. त्या निवडूनही आल्या. यावरून सासू- सुनांत वितुष्ट आले. आमदार नंदिनी सध्या भाड्याच्या घरात राहतात. सोमवारी त्या सासरी गेल्या. तेव्हा सासूशी त्यांचा वाद झाला. नंदिनी आपल्या अंगावर धावून आली तसेच शिवीगाळही केली, असे सासू कांताबाई यांनी तक्रारीत म्हटले आहे.