आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमपीच्या टोळीचे शहरात गुन्हे! ट्रक पळवून करण्यात येत होते टायर लंपास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - यवतमाळ पोलिसांनी ग्वाल्हेर येथील तिघांसह अन्य दोन, अशा पाच जणांच्या टोळीस सोमवारी रात्री पकडलेल्या टोळीने अमरावती शहरातही गुन्हे केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यामुळे अमरावती पोलिस या टोळीस ताब्यात घेणार आहे.

उस्ताद खान नासिर खान (25), असरफ खान वहीद खान (45), नासिर खान रशिद खान (22 सर्व रा. मोहना जि. ग्वाल्हेर मध्यप्रदेश) अनीस खान रसूल खान (22 रा. शिवपूरी, मध्यप्रदेश) आणि घनश्याम ग्यासी जाटव (30 रा. डोंगरपूर, मध्यप्रदेश) अशी त्यांची नावे आहेत. ट्रक चोरुन त्याचे साहित्य पळवण्याचा त्यांचा गोरखधंदा होता. अमरावतीतही तीन महिन्यांपूर्वी, अशा घटना घडल्या होत्या. त्यामध्ये लाखोंचे ट्रक साहित्य व टायर चोरीला गेले होते. या प्रकरणी नागपूरी गेट, नांदगाव पेठ ठाण्यात गुन्हा दाखल आहे. शहरातील ट्रान्सपोर्टनगर येथून चोरलेला ट्रक अमरावती नागपूर महामार्गावर सोडून त्याचे टायर घेवून पळ काढला होता. य्ही टोळी विदर्भात चोरी करत असल्याचे प्राथमिक माहितीमधून उघड झाले असून अमरावती पोलिस त्यांना लवकरच ताब्यात घेणार आहे. त्यासाठीची आवश्यक प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली असून गुन्हे शाखा या प्रकरणी काम करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.