आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायालयांमध्ये कूलर लावण्यासाठी निधी द्या, नागपूर खंडपीठाचे सरकारला निर्देश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये प्रचंड उकाडा असून मुंबई विभाग वगळता उर्वरित महाराष्ट्रातील न्यायालये आणि वकिलांच्या कक्षात कूलर लावण्यासाठी राज्य सरकारने ३ कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर करावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहे.

कनिष्ठ न्यायालये, जिल्हा न्यायालय आणि उच्च न्यायालयांमध्ये कोर्ट रूमपासून ते वकिलांच्या कक्षापर्यंत उन्हाळ्यात कूलर लावण्यात यावे, अशी विनंती करणारी जनहित याचिका नागपूर उच्च न्यायालय असोसिएशनने केली. या याचिकेवर बुधवारी बुधवारी न्यायमूर्ती वासंती नाईक आणि अनंत बदर यांच्यासमोर सुनावणी झाली. याचिकेच्या सुनावणीदरम्यान सरकारने उच्च न्यायालयाने राज्यातील संपूर्ण न्यायालयांमध्ये कूलर आणि एसी बसविण्यासाठी ७० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी ६० कोटी मुंबई विभागात एसी बसविण्यासाठी येणार आहे. त्यावर उच्च न्यायालयाने हरकत घेत २१ मार्च रोजी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावनुसार, मुंबई विभाग वगळून उर्वरित महाराष्ट्रातील न्यायालयांमध्ये कूलर बसविण्यास सांगितले. त्यासाठी पुढील सुनावणीपूर्वी ३ लाख ६० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ मे रोजी
होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...