आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Nagpur Down Line Start But Up Block Near Wardha

हैदराबाद- निझामुद्दीन दक्षिण एक्स्प्रेस नागपूरकडे रवाना; मुंबईकडे येणारा अप मार्ग बंदच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- मुंबईहून तसेच हैदराबादहून नागपूरकडे येणारा डाऊन मार्ग आज (सोमवार) तब्बल 60 तासांनंतर सुरु करण्‍यात आल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. हैदराबाद- निझामुद्दीन दक्षिण एक्स्प्रेस ही पहिला गाडी नागपूरकडे रवाना करण्यात आली. मात्र मुंबईकडे जाणारा अप मार्ग अद्याप बंद आहे. या मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरु असून अजून 20 तास हे काम चालणार असल्याचेही समजते.

मुसळधार पावसामुळे वर्धा-नागपूर रेल्वेमार्गावर शुक्रवारी रुळांखालील माती वाहून गेली होती. यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. भुसावळहून नागपूरकडे जाणार्‍या 18 गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले होते. परंतु आता गाडी आपल्या नियोजित वेळापत्रकानुसार धावत आहे. मुंबईकडे जाणार्‍या गाड्या डाऊन मार्गावरून काढण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे.