आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंडेंची खासदारकी रद्द करा, नागपूरमधील आरटीआय कार्यकर्त्याची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- सन 2009च्या लोकसभा निवडणुकीत सदोष उमेदवारी अर्ज दाखल दाखल करून संविधानाची क्रूर थट्टा करणारे भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते विलास वानखेडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.‘या कृतीमुळे मुंडेंचा विद्यमान लोकसभेचा कार्यकाळ गृहीत धरण्यात येऊ नये, त्यांना या कालावधीत देण्यात आलेले वेतन व भत्ते वसूल करण्यात यावे तसेच या प्रकरणात दोषी असलेले तत्कालिन निवडणूक निर्णय अधिका-यांवर कठोर कारवाई करण्यात यावी’, अशी मागणीही वानखेडे, श्याम भुसेवार यांनी केली. मुंडे यांच्या नामनिर्देशन पत्राच्या भाग-5 मध्ये निवडणूक अधिका-याने अर्ज स्वीकारले की नाकारले, हा रकाना आजही कोराच आहे. त्याचप्रमाणे निवडणुकीसाठी उमेदवाराने शपथ किंवा दृढकथन करणे अनिवार्य असताना मुंडे यांनी प्राधिकृत व्यक्तीच्या समक्ष शपथ घेतलीच नाही, याकडेही वानखेडे यांनी लक्ष वेधले.