आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Munde Not Filled Complete Form Of Lok Sabha Election

मुंडे यांचा गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळचा उमेदवारी अर्जच अपूर्ण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - भाजप नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांचा गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळचा उमेदवारी अर्जच अपूर्ण आहे. तत्कालीन निवडणूक अधिका-यांनी तो स्वीकारला की नाकारला, याबाबत कुठलाही निर्णय दिलेला नाही. तो भरताना उमेदवाराने संविधानाप्रति घ्यावयाची शपथ मुंडे यांनी घेतली नाही. त्यामुळे त्यांची निवडणूक व खासदारकी अवैध ठरते, असा दावा यवतमाळचे आरटीआय कार्यकर्ते विलास वानखेडे यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत केला. यासाठी त्यांनी उमेदवारी अर्जाच्या प्रती सादर केल्या.
हायकोर्टात याचिका : निवडणुकीत 8 कोटी खर्च केल्याचा दावा मुंडे यांनी केला होता. त्यावर औरंगाबाद खंडपीठात 3 फेब्रुवारी रोजी याचिका सादर केली असून त्यावर 10 फेब्रुवारी रोजी सुनावणी आहे, असे वानखेडे म्हणाले. याचिकेत मुंडे यांना तीन वर्षांसाठी अपात्र ठरवावे, खर्चाच्या विवरणासोबत खोटे शपथपत्र दिल्याने त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, प्रकरणाची सक्षम यंत्रणेमार्फत चौकशी करावी, अशी मागणी आहे.
प्रसिद्धीसाठी खटाटोप
माझ्या खासदारकीमुळे पाच वर्षांत अनेकांना पोटशूळ उठले. त्यातलाच हा प्रकार. खासदारकी रद्द करण्यात विरोधक अपयशी ठरले. आता अशा रीतीने माझ्या बदनामीचा प्रयत्न होत आहे. आरोपांत दम नाही. प्रसिद्धी मिळवण्यासाठी हा खटाटोप आहे.’गोपीनाथ मुंडे, खासदार, भाजप (बीड)