आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकेत ‘कहीं खुशी कहीं गम’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - महापालिकेच्या शहर बस वाहतूक कर्मचार्‍यांच्या भत्त्यात वाढ होणार आहे. लाल बावटा शहर बस वाहतूक कर्मचारी युनियनने (आयटक) दिलेल्या निवेदनावर सरकारी कामगार अधिकारी डी. बी. जाधव यांनी निर्णय दिला.

शहर बस कर्मचारी संघटनेच्या वतीने सहायक कामगार आयुक्तांना 18 फेब्रुवारीला निवेदन देण्यात आले होते. कायम कामगार व 18 महिने पूर्ण झालेल्या कामगारांना जुलै 12 पासून वाढलेला खास भत्ता देण्यात यावा, भविष्यनिर्वाह निधीच्या पक्क्या पावत्या देण्यात याव्यात, सर्व कर्मचार्‍यांचे बँकेमार्फत वेतन केले जावे, अशी मागणी करण्यात आली होती. याबाबत सरकारी कामगार अधिकारी डी. बी. जाधव यांच्यासमोर 11 मार्च 14, 28 एप्रिल 14, 9 मे 14, 27 मे 14, 31 मे 14 रोजी सुनावणी घेण्यात आली. 31 मे 14 रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान आयटकच्या वतीने अध्यक्ष बी. के. जाधव, सचिव राजेश पंड्या तर अंबा माल व प्रवासी वाहतूक संस्थेच्या वतीने बी. आर. भागवत, सचिव शरद उमंग व व्यवस्थापक राजेश गोफणे उपस्थित होते. सर्व कायम बस चालक, वाहक व 18 महिने पूर्ण केलेल्या सर्व कर्मचार्‍यांना जुलै 12, जानेवारी 13, जुलै 13 या तीन खास भत्त्यांमध्ये वाढ करून जून 14 च्या वेतनापासून वाढ करण्याचे मान्य झाले. सर्व कर्मचार्‍यांच्या वेतनात 700 ते 800 रुपये वाढ होणार आहे. भविष्य निर्वाह निधीच्या पावत्याही देण्यात येणार. सहायक कामगार आयुक्त कार्यालयात या प्रकरणावर चर्चा होऊन निर्णय झाल्याने कर्मचार्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
शहर बस वाहतूक, कर्मचारी भत्त्यांत वाढ, प्रत्यक्ष संख्येत घोळ

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत देखील सुरक्षा रक्षकांचा प्रश्न गाजला होता. सुरक्षा रक्षकांचे भविष्यनिर्वाह निधीचे पैसे कंत्राटदाराकडून भरली जात नसल्याची बाब समोर आली होती. वेतन वेळेवर न मिळणे, अत्यंत कमी मिळणे आदी बाबींचा यामध्ये समावेश होता. महापालिकेच्या हजेरी पुस्तकावर आणि प्रत्यक्ष कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या संख्येत तफावत असल्याची माहिती आहे.