अमरावती - महापालिकेच्या आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीने होणारी चार डॉक्टर पाच सहायक परिचारिकांची नियमबाह्य भरती प्रक्रिया जनविकास-रिपाइंचे गटनेते तथा स्थायी समितीचे माजी सभापती प्रकाश बनसोड यांनी रोखली आहे. बिंदुनामावली सामाजिक आरक्षणाला हरताळ फासून होणारी ही प्रक्रिया बनसोड यांनी आयुक्तांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर आयुक्तांनी लगेच बिंदुनामावली आरक्षणाच्या उल्लेखासह नवी जाहिरात देण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता नऊही पदांसाठी नव्याने संपूर्ण प्रक्रिया राबवली जाणार आहे.
मनपाच्या आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीने चार डॉक्टर पाच सहायक परिचारिकांची भरती करावयाची आहे. यासाठी अर्ज मागवणारी जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली होती. ती वाचत असताना त्यात सामाजिक आरक्षण डावलल्याचे बनसोड यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच ही बाब आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या लक्षात आणून दिली आणि आयुक्तांनीही लगेच आरोग्य अधिकारी डॉ. श्यामसुंदर सोनी यांच्याशी संपर्क साधून बिंदुनामावली आरक्षणाच्या उल्लेखासह नवी जाहिरात देण्याचे आदेश दिले.
गरजेनुसार महापालिकेत वेळोवेळी सरळ सेवा भरती केली जाते. कालांतराने त्या कर्मचार्यांना कायम करण्याचे धोरणही आखले जाते. मात्र, असे करताना सामाजिक आरक्षणाचे सूत्र पाळले गेले नाही, असा आजवरचा अनुभव आहे. २००५ मध्ये ६९ कर्मचार्यांना कायम करण्याचा विषय आला, तेव्हाही असेच झाले होते. त्यामुळे त्यांना कायम करा; मात्र बिंदुनामावलीचे सूत्र वापरून कृती करा, असे शासनाचे आदेश होते. त्यामुळे भविष्यात अशी चूक पुन्हा होऊ नये, याबाबत काळजी घेणे हे प्रत्येकाचेच कर्तव्य असल्याचे बनसोड यांनी सांिगतले.
मुलाखती होणार १३ ला
पूर्वीच्याकार्यक्रमानुसार सर्व नऊही पदांसाठी मे पर्यंत अर्ज मागवण्यात येऊन रोजी मुलाखती घेतल्या जाणार होत्या. बनसोड यांनी या प्रक्रियेतील दोष लक्षात आणून दिल्यावर आता फेरप्रक्रिया केली जाणार असून मुलाखतीचा कार्यक्रम १३ मे रोजी होणार आहे. गुडेवार यांनी तशा सूचना संबंधितांना दिल्या आहेत.
यामुळेच वाढतोय अनुशेष
महापालिकेत सामाजिक आरक्षणाचे सूत्र पाळावेच लागते. मात्र, काही अधिकारी या मुद्द्याला पद्धतशीर बगल देतात. यापूर्वी श्यामला शुक्ला आयुक्त असताना ही चूक सुधारली गेली होती. त्यानंतर आता चंद्रकांत गुडेवार यांनी लक्ष घालून हा मुद्दा दुरुस्त केला आहे.