आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Murder News In Marathi, Divya Marathi, Nagpur, Crime

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चाकूने वार करून दोघांचा नागपूरात खून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या काही युवकांनी पूर्ववैमनस्यातून दुचाकीवर जाणा-या चौघांना गाडीखाली चिरडले आणि जखमी झालेल्यांवर चाकूने वार करून दोघांचा खून केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री नागपुरात घडली. मो. रशीद खान (25) आणि अब्दुल कादीर अन्वर बेग (24, दोघेही रा. हिवरीनगर) अशी मृतांची नावे आहेत, तर रोहित नारनवरे (15) हा गंभीर जखमी आहे.

चार दिवसांपूर्वी रशीद खान याचा दिलीप कोसुरकर याच्याशी वाद झाला होता. शुक्रवारी रशीद खान, अब्दुल बेग, रोहित आणि प्रदीप भारत घोडे हे गजानन वंजारी याच्या लग्नाला आले होते. त्या ठिकाणी त्यांचा सामना दिलीप कोसुरकर, जगदीश कोसुरकर आणि त्यांच्या मित्रांशी झाला. त्या वेळी रशीद खान आणि दिलीपमध्ये बाचाबाची झाली.

रात्री 12 वाजता रशीद आणि त्याचे तिघे मित्र एका दुचाकीवरून घरी जाण्यासाठी निघाले. त्या वेळी दिलीप कोसुरकर आणि त्याच्या मित्रांनी स्कॉर्पिओ गाडीने त्यांचा पाठलाग केला. त्या वेळी दिलीपच्या गाडीने रशीदच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यानंतर दिलीप आणि त्याच्या साथीदारांनी गाडीखाली उतरून रशीद आणि अब्दुल यांच्यावर चाकूने वार केले. यात रशीद आणि अब्दुलचा जागीच मृत्यू झाला, तर रोहित हा मृत्यूशी झुंज देत आहे.