आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरच्या तीन भाजप आमदारांचे आंदोलन, अतुल सावेंचा विरोध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : उपोषणाला बसलेले आमदार मुरकुटे, स्नेहलता कोल्हे व शिवाजी कर्डिले.
नागपूर - नगरच्या मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडणे थांबवण्याच्या मागणीसाठी मंगळवारी भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे व स्नेहलता कोल्हे यांनी विधिमंडळ परिसरात सरकारविरुद्ध आंदोलन केले. दरम्यान, औरंगाबादेतील भाजप आमदार अतुल सावे यांनी मात्र आपल्याच पक्षातील आमदारांच्या या उपोषणाला विरोध केला.

विधिमंडळाचे कामकाज सुरू होताच ११ वाजता या आमदारांनी विधानसभेच्या पाय-यांवर बसून लाक्षणिक उपोषण केले. पिण्यासाठी म्हणून मराठवाड्याला देण्यात येणारे पाणी उद्योजकांना विकण्यात येत असून, तेथील शेतीलाही पुरवण्यात येत आहे, असा आरोप कर्डिले यांनी केला. तत्कालीन आघाडी सरकारने २००५ मध्ये मेंढेगिरी समिती स्थापन केली होती. समितीच्या अहवालानुसार दरवर्षी पाणी पळवले जाते, असेही ते म्हणाले. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी उपोषणार्थींची भेट घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

दरम्यान, नगरचे पाणी मराठवाड्याच्या हक्काचेच असल्याचे सांगत आमदार सावे यांनी मात्र उपाेषणस्थळी येऊन आंदोलनाला विरोध केला.