आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारचालकाच्या डुलकीमुळे पाच जणांनी गमावले प्राण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - अमरावतीहून नागपूरकडे जाणारी टाटा सफारी गाडी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर पाठीमागून धडकली. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर चालकासह तिघे गंभीर जखमी आहेत. कोंढाळीजवळ बुधवारी पहाटे हा अपघात घडला. कारचालकाचा डोळा लागल्याने इतरांना आपले जीव गमवावे लागले.
अलाहाबाद येथील बुद्धसिंग परिवार सफारी कारने मुंबईला आला होता. काम आटोपून सर्वजण मंगळवारी रात्री मुंबईहून अलाहाबादच्या दिशेने निघाले होते. बुधवारी पहाटे चालकाचा डोळा लागल्याने कोंढाळीजवळ त्यांची कार ट्रकला धडकली. यात प्रतिभासिंग बुद्धसिंग (35), प्रिया बुद्धसिंग (8), राजनबाई धर्मराजसिंग (50), धर्मराजसिंग व समाजवादी पक्षाचे नेते नरेंद्रकुमार यादव (40) यांचा जागीच मृत्यू झाला, तर कारचालकासह तीन जण गंभीर जखमी झाले.

छायाचित्र - संग्रहित