आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भद्रावतीजवळील गावात मोलमजुरी करणार्‍या महिलेवर सामूहिक अत्याचार; तिघांना अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - मोलमजुरी करणार्‍या चाळीस वर्षीय विवाहित महिलेच्या घरात शिरून तिच्यावर तिघांनी अत्याचार केला. ही घटना चंद्रपूर जिल्हय़ात भद्रावतीजवळील सायवान या गावात मंगळवारी उघडकीस आली. भद्रावती पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.

सायवान हे गाव भद्रावतीपासून 12 किलोमीटर अंतरावर आहे. पीडित महिला पतीपासून वेगळी एकटीच राहते. ती मोलमजुरी करते. सोमवारी रात्री ती घरी एकटी असताना रात्री 8 च्या सुमारास तीन युवक तिच्या घरात शिरले. तिघांनी तिच्यावर रात्री 2 पर्यंत अत्याचार केले. या महिलेने आरडाओरड केल्यावर गावातील लोक जमा झाले होते. त्यामुळे आरोपी पळून गेले. मंगळवारी सकाळी पीडित महिलेने भद्रावती पोलिस ठाणे गाठून याबाबतची तक्रार केली.

या तक्रारीची दखल घेऊन भद्रावती पोलिसांनी संतोष थेटे, प्रवीण गिरखंडे, हेमंत कळसकर अशा तिघांना अटक केली. तिघे 22 ते 25 वयोगटातील असून, गावातीलच रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.