आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर कारागृह अनुपालन समितीने मुख्यमंत्र्यांचे आदेश डावलले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - नागपूर कारागृहात अनागोंदी कारभार सुरू असल्याची जाणीव असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारताच १५ डिसेंबर २०१४ रोजी अपर पोलिस महासंचालक व कारागृह महानिरीक्षकांच्या अध्यक्षतेखाली अनुपालन समिती नेमली होती. या समितीने वेळेत चाैकशी अहवाल सादर केला असता तर कदाचित आराेपी पळून जाण्याची नामुष्की टळली असती.

या समितीला २१ जानेवारीपर्यंत अहवाल द्यायचा होता. परंतु महानिरीक्षकांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्राला गंभीरतेने घेतले नाही. कैदी फरार झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ३१ मार्च रोजी पुन्हा पत्र पाठवून समितीचा अहवाल तातडीने देण्याचे आदेश बजावले आहेत. दरम्यान, ‘एसीबी’चे महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी रविवारी दाेन तास कारागृह अधिकार्‍यांची बैठक घेऊन त्यांचे कान उपटले. त्यावेळी काहींनी निलंबित अधीक्षक वैभव कांबळे यांच्या भ्रष्ट कारभारामुळेच असे प्रकार घडत असल्याची जाहीर कबूली दिली.

कारागृह बनले ‘मोबाईल शॉपी’
दररोज सापडणार्‍या मोबाईलमुळे नागपूरचे कारागृह हे जणू ‘मोबाईल शॉपी’च बनली असल्याचे मत चौकशीसाठी नागपुरात आलेल्या वरिष्ठ पोलिस व तुरुंग अधिकार्‍यांनी व्यक्त केले आहे. रविवारी सकाळी १० च्या सुमारास बराक क्रमांक तीनमध्ये सात मोबाईल, दोन चार्जर, सहा बॅटरी, पाच सीमकार्ड, तीन चाकू आणि ५५० ग्रॅम गांजा सापडला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.