आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagpur Corporation Starts Its Action Against Illegal Construction

नागपूर महापालिकेची अनधिकृत बांधकामांविरूध्‍द कारवाई सुरू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - ठाण्‍यातील अनधिकृत इमारत कोसळून गेल्या आठवड्यात अनेक निष्‍पाप जीवांचा बळी गेला होता.याघटनेच्या पार्श्‍वभूमीवर नागपूर नागपूर महापालिका आयुक्त श्‍याम वर्धने यांनी शहरातील अ‍नधिकृत बांधकामांविरूध्‍द मंगळवारपासून (ता.16 ) कारवाई सुरू केली आहे. शहरातील एकूण 1422 अनधिकृत इमारतींची यादी तयार करण्‍यात आली आहे. त्यातील 968 अनधिकृत बांधकामांना नोटिसाही बजावण्‍यात आल्या आहेत. अनधिकृत इमारती अधिकृत करण्‍यासाठी यापूर्वी अर्जही मागवण्‍यात आले होते. त्यानंतर 625 अनधिकृत बांधकामांवरती हातोडा मारण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे.महापालिकेने मंगळवारपासून धडक अभियान सुरू केले असून अनधिकृत बांधकाम पाडण्‍यात येणार असल्याचे आयुक्त रवींद्र कुंभारे यांनी सांगितले.


तीनपट कर
अनधिकृत बांधकाम करणा-यांकडून महापालिका आता तीनपट कर वसूल करणार आहे.महापालिकेने या अभियानासाठी 50 अधिका-यांची नियुक्‍ती करण्‍यात आली असून यात उपअभियंता आणि सहाय्यक अभियंता श्रेणीतील अधिका-यांचा समावेश आहे.