आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपराजधानीतील महालेखाकार भवनावर सीबीआय छापा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - उपराजधानीतील महालेखाकार भवनात निर्माण करण्यात येत असलेल्या बहुउद्देशीय सभागृहाच्या बांधकामात मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारीनंतर मंगळवारी सीबीआयने महालेखाकार कार्यालयावर छापा टाकला. या प्रकरणात स्थापत्य तज्ज्ञांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषी अधिकारी आणि कंत्राटदारांवर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

नागपूर खंडपीठाच्या शेजारी महालेखाकार भवन आहे. या ठिकाणी कर्मचारी आणि कार्यालयीन कामांसाठी बहुउद्देशीय सभागृह बांधण्यास मागील वर्षी मंजुरी मिळाली. सभागृहाच्या बांधकामाचे कंत्राट केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाचे कंत्राटदार के. के.चॅटर्जीला दिले. सभागृहाचे काम अंतिम टप्प्यात आले असताना त्यात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार अज्ञात व्यक्तीने सीबीआयकडे केली.

तक्रारीच प्राथमिक चौकशी केल्यानंतर या प्रकरणात प्रथमदर्शनी सत्य आढळल्यानंतर सीबीआयच्या अधिकार्‍यांनी मंगळवारी सकाळी 11 च्या सुमारास कार्यालयावर छापा टाकला. दिवसभर सीबीआयची कारवाई सुरू होती. यादरम्यान, सीबीआयच्या अधिकार्‍यांनी सभागृहाचे कॉलम, बीम, छत, सिमेंट, पीओपी, लोखंड आदीचे नमुने घेतले. याशिवाय सभागृहाच्या बांधकामाविषयीचे दस्तऐवजही ताब्यात घेतले आहे.