आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीकडे लक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतातील सार्वत्रिक निवडणुकीवर आमचे बारीक लक्ष आहे. आमच्या दृष्टीनेही ही निवडणूक महत्त्वाची असल्याचे मत ब्रिटनचे उच्चायुक्त सर जेम्स डेव्हिड बेव्हन यांनी गुरुवारी नागपुरात बोलताना व्यक्त केले.

निवडणूक प्रकिया पाहण्यासाठी सर जेम्स डेव्हीड बेव्हन हे गुरुवारी संपूर्ण दिवस नागपुरात होते. सकाळी त्यांनी भाजप नेते नितीन गडकरी यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तसेच लोकसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी बेव्हन म्हणाले, ‘भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. निवडणूक हा लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आहे. त्यामुळे तो प्रत्यक्ष अनुभवण्यासाठीच आपण देशभरात फिरत आहोत. मी दिल्लीतच राहत असलो तरी देशातील इतर भागात होणारी निवडणूक आपल्या दृष्टीने उत्सुकतेचा व महत्त्वाचा विषय आहे.’

नागपुरातील दिवसभराच्या दौर्‍यात बेव्हन यांनी काही निवडक मतदान केंद्रांना भेट देऊन प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया जाणून घेतली. अल्पसंख्याक समाजाची वस्ती असलेल्या मोमीनपुर्‍यातील केंद्रांनाही त्यांनी भेट दिली. जिल्हाधिकारी, काँग्रेसचे उमेदवार विलास मुत्तेमवार यांच्याशीही बेव्हन यांनी चर्चा केली.