आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर आयआयएम यंदापासून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) ही संस्था नागपूरमध्ये व्हावी यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांना यश आले. बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत नागपूर तसेच विशाखापट्टणम (आंध्र), सिरमौर (हिमाचल), संभलपूर (ओडिशा), बोधगया (बिहार), अमृतसर (पंजाब) येथील आयआयएमला मंजुरी दिली. पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी या संस्थांमध्ये २०१५-१६ चे पहिले सत्र सुरू हाेईल. त्यात १४० वि द्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. विद्यार्थ्यांना सामायिक प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून या संस्थेमध्ये प्रवेश दिला जाईल.
बातम्या आणखी आहेत...