आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: नागपुरात लिफ्टला भीषण आग, होरपळून एकाच कुटुंबातील 5 मृत्युमुखी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- गोकूळपेठमधील एका इमारतीच्या लिफ्टला आज (शुक्रवार) पहाटेच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत एका कुटुंबातील 5 सदस्यांचा होरपळून मृत्यू झाला. आगीचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोकूळपेठमधील अजिंक्य प्लाझा या इमारतीच्या पार्किंगमधील एका कारला काल रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. या पार्किंगमध्ये जागा कमी असल्याने अगदी जवळ जवळ दुचाकी लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे इतरही गाड्या आगीच्या कचाट्यात आल्या. पार्किंगमध्ये झोपलेल्या सुरक्षा रक्षकाला हे लक्षात आल्यावर त्याने इमारतीतील लोकांना बाहेर पडण्यास सांगितले. यावेळी इमारतीच्या सर्वांत वरच्या मजल्यावर असलेले कुटुंब लिफ्टने खाली उतरत होते. लिफ्ट तळमजल्यावर आल्यावर तिलाही भीषण आग लागली. यामुळे एकाच कुटुंबातील पाच जण मृत्युमुखी पडले.
सलिला सिरिया (वय 65), मुलगी श्रुती माळी (वय 30), त्यांची नात शहाना (वय 2), राघिणी सिरिया (वय 32) आणि निरोश सिरिया (वय 3) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.
अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले असून इमारतीतील इतर नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे.
कोणत्याही इमारतीत कोणतीही दुर्घटना घडली तरी लिफ्ट वापर करू नये, अशी सूचना केली जाते ती किती महत्त्वाची आहे, ही बाब यामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
पुढील स्लाईडवर बघा जिवाचा थरकाप उडवणारी आणि आगीत भस्म झालेल्या लिफ्टची छायाचित्रे...