आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagpur Market Over Pack After Shut Down Of Businessman Strike

नागपुरातील बाजारपेठा हाऊसफुल्‍ल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- २0 दिवसाच्‍या बंद नंतर आज खर्‍या अर्थाने बाजारपेठा उघडल्या. त्यातच अक्षयतृतीयेचा शुभमुहूर्त व लग्नसराईचे दिवस असल्याने सराफा व कापड बाजारात ग्राहकांची गर्दी उसळली होती.

महाल, इतवारी, सीताबर्डी, सदर, धरमपेठसह शहरातील दुकाने गर्दीमुळे गजबजून गेली होती. दुपारच्या सुमारास उन्हामुळे फारशी गर्दी नव्हती. परंतु सायंकाळी ग्राहकांनी खरेदीसाठी एकच गर्दी केली होती.

अक्षयतृतीयेचा शुभमुहूर्त व लग्नसराईमुळे ग्राहकांची होणारी गर्दी विचारात घेता, व्यापारी व ग्राहकांच्या सोयीसाठी नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉर्मसने स्थानिक संस्था कर (एलबीटी) विरोधातील बंद १५ मे पर्यंत मागे घेण्याचा निर्णय शनिवारी घेतला.

स्थानिक संस्था कर (एलबीटी) विरोधातील बंद १५ मे पर्यंत व्यापारी संघटनांनी शनिवारी मागे घेतला. बंद दरम्यान मागील १९ दिवसांत व्यापार ठप्प होता. काही तुरळक बाजारपेठा सुरू होत्या. किरकोळ विक्रीची दुकानेही काही प्रमाणात सुरू होती.