आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नागपूर : मेट्रोच्या कामाला जुलैमध्ये होणार सुरुवात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - नागपूरकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. उपराजधानीचे शहर असलेले नागपूर आता मेट्रोचे शहर म्हणून ओळखले जाणार आहे. केंद्र शासनाने नागपूर मेट्रोला हिरावा कंदिल दिला आहे. येत्या जुलै महिन्यापासून मेट्रोच्या कामालाही सुरुवात केली जाणार आहे. नुकेतच राज्याच्या राजधानीत मोनोरेलची यशस्वी चाचणी झाली. चेंबूर ते वडाळा या मार्गावर मुंबईत मोनोरेल प्रथम धावणार आहे.

नागपूरच्या उत्तर व दक्षिण भागाला जोडणारे मेट्रोचे दोन मार्ग असणार आहेत. पहिला मार्ग २१ किलोमीटरचा तर दुसरा १८ किलोमीटरचा असणार आहे. यामुळे शहरातील वाहतूकीची समस्या सुटण्यास मदत होईल अशी शक्यता वाहतूक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

मेट्रो प्रकल्पासाठी ९ हजार ७ कोटी खर्च अपेक्षित आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकार निधी देणार आहेत. शहराची वाहन संख्या १० लाखांच्या आसपास आहे. येणा-या काळात ती वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेस्तेवाहतूकीवरील ताण लक्षात घेता शहरात मेट्रो रेल्वेची मागणी ब-याच दिवसापासून होत आहे.