आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर-मुंबई रेल्वे वाहतूक विस्कळीतच, दुरुस्‍त केलेला मार्ग खचला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- पावसाच्या तडाख्यामुळे वर्धानजीक उखडलेल्या रेल्वे पुलाच्या दुरुस्तीचे काम अद्याप सुरू आहे. परिणामी नागपूर-मुंबई रेल्वे मार्गावरील वाहतूक एका डाउन लाइनवरूनच सुरू आहे, परंतु मंगळवारी हा मार्गही दबला होता. त्यामुळे काही काळासाठी वाहतूक बंद करण्यात आली होती.

19 जुलै रोजी विदर्भात मुसळधार पाऊस झाला. यात नागपूर वर्धा मार्गावरील तुळजापूर-सिंधी दरम्यान असणारा छोटा पूल आणि 400 मीटर रेल्वे रुळाखालची खडी, गिट्टी वाहून गेली होती. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. मागार्वरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी रेल्वे विभागाने दिवसरात्र परिश्रम घेतले. सोमवारपासून मुंबईकडून नागपूरकडे येणारी डाऊन लाईन सुरू झाली होती. परंतु मंगळवारी ही लाईन दबल्यामुळे पुन्हा वाहतूक कोलमडली होती. या मार्गावर हेव्ही ट्रॅफिक असल्याने गाड्या विलंबाने धावत आहेत, तर काही गाड्या पर्यायी मार्गांवरून वळविण्यात आल्या. लाईनचे काम बुधवारपर्यंत पूर्ण होईल, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

नंदीग्रामसह तीन गाड्या रद्द
नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस, नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस आणि गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस मंगळवारी रद्द करण्यात आल्या. 14 गाड्या इतर मार्गाने वळविण्यात आल्या.