आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagpur News In Marathi, Curfew Like Situation In Mahal

नागपुरमधील महाल परिसरात तणाव, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- महाल परिसरातील गांधी गेटजवळ असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची तलवार वाकविल्याने आज (गुरुवार) तणावाचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला असून या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी महाल येथील गांधी गेटजवळ असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची तलवार वाकविलेल्या अवस्थेत आढळून आली. त्यानंतर ही बाब अगदी वणव्यासारखी शहरात पसरली. या घटनेविरुद्ध महाल परिसरातील नागरिकांनी अघोषित बंद पुकारला असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. काही संतप्त नागरिकांनी स्टार बसची तोडफोड केल्याने तणावात भर पडली आहे. दरम्यान, पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला असून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले आहे.
पूतळ्याची आणि तणावाची छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...