आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही 'पटीयाला पेग बार' सुरूच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपुर - उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही नागपुरमधील म्हाडा कॉलनीत असलेला पटियाला पेग बार उघडपणे सुरु आहे. हा बार बंद करण्यासाठी महिलांनी मोठे आंदोलन केले होते.
बार अवैधपणे सुरु असल्याचे नोंदवत तो बंद करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले होते. मात्र, असे असतानाही बार राजरोसपणे सुरु असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
न्यायालयाच्या आदेशानंतरही बार सुरु असल्याने स्थानिक नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत. तर, दुसरीकडे न्यायालयाच्या आदेशाची प्रत मिळाली नसल्याचा दावा बार मालकाने केला आहे.