आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरीवरून काढल्याने नागपुरात कर्मचा-यांनी 16 स्टार बस फोडल्या

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - शहर वाहतूक करणा-या स्टार बसच्या कर्मचा-यांनी नोकरीवरून कमी करण्यात आल्याचा राग मनात ठेवून मंगळवारी 16 स्टार बसची तोडफोड केली. गेल्याच महिन्यात जवळपास 100 कर्मचा-यांना कामावरून कमी करण्यात आले होते. या अन्याय कारवाईच्या विरोधात सदर कर्मचा-यांनी आंदोलन छेडले आहे. आज या आंदोलनाला हिंसक वळण लागले. शहरात वेगवेगळ्या भागात संतप्त कर्मचा-यांनी 16 स्टार बसेसची तोडफोड करत संताप व्यक्त केला. तसेच काही ठिकाणी शहर बसच्या चालकांनाही मारहाण करण्यात आली. सुदैवाने प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही. या प्रकरणी स्टार बसच्या प्रशासनातर्फे पोलिसात तक्रार देण्यात आली असून अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.