आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळी अधिवेशन :अमरावती जिल्ह्यातील आमदार करणार आवाज ‘बुलंद’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - नागपुरात हिवाळी अधिवेशनास सुरुवात झाली असून, अमरावती जिल्ह्यातील आमदारांनी आपआपल्या मतदारसंघांतील प्रश्न, समस्या आणि मागण्या मांडून त्यावर चर्चा घडवून आणण्यासाठी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. स्वतंत्र विदर्भ राज्यनिर्मितीच्या ठरावापासून वीज, रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण या पायाभूत सुविधांपासून ते सिंचनापर्यंतच्या मुद्दय़ांचा त्यामध्ये समावेश आहे. अमरावतीचा औद्योगिक विकास, तीर्थक्षेत्र आणि पर्यटन विकास, पूरग्रस्तांचे पुनर्वसन, आदिवासी विकास आदी मुद्दे अमरावती जिल्ह्यातील जनप्रतिनिधी अधिवेशनात लावून धरणार आहेत. मेळघाटातील मूलभूत प्रश्न, अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना मदत, शेतमाल दरवाढीचा मुद्दा, कर्जमाफी, कुपोषण आणि रोजगारासंबंधित प्रश्न विधिमंडळात उपस्थित करण्यात येणार आहेत. महिलांसाठी स्वतंत्र ठाणे, नांदगावपेठ येथील पंचतारांकित एमआयडीसीच्या प्रश्नापासून खारपाणपट्टय़ाचा विकास आणि दुर्गम भागातील नागरिकांचे जिव्हाळ्याचे प्रश्न हिवाळी अधिवेशनात जोरकसपणे मांडण्याचा निश्चय जिल्ह्यातील आमदारांनी केला आहे.


पुढील स्लाइडमध्ये, स्वतंत्र विदर्भाचा ठराव