आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagpurs Village Becomes Indias First Wifi Enabled Village

नागपूरमधील पंचगाव बनले 'चटकफू' वायफाय देणारे पहिले खेडे; 25 शहरांतही सुविधा मिळणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - जिल्‍ह्यातील पंचगावात मोफत वायफाय सुविधा उपब्‍लध झाली असून, अशा प्रकारचे हे देशातील पहिलेच गाव आहे. आदर्श ग्राम योजनेंतर्गत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हे गाव दत्‍तक घेतले आहे. गावात मोफत वायफाय सुविधा उपलब्‍ध झाल्‍याने ग्रामस्‍थांचा आनंद गगणात मावेनासा झाला आहे. या बाबत गडकरी म्‍हणाले, '' तळागाळापर्यंतमाहिती तंत्रज्ञान पोहोण्‍यासाठी पंतप्रधान मोदी यांनी डिजिटल इंडिया ही संकल्‍पना मांडली आहे. त्‍याचाच एक भाग म्‍हणून या गावात मोफत वायफाय सेवा दिली जात आहे'' अशी माहितीही गडकरी यांनी दिली.


देशातील 25 शहरांमध्‍येही मिळणार मोफत वायफाय

देशातील 25 शहरांमध्ये केंद्र सरकार फ्री वायफाय सुविधा सुरू करणार आहे. याची सुरुवात उत्तरप्रदेशातील आग्रा येथून झाली. अन्य शहरांध्ये वायफाय सुरु करण्यासाठी सरकारने सर्व्हिस प्रोव्हायडर्सचे पॅनेलही नियुक्त केले आहे. या नंतर देशातील चार महत्‍त्‍वाच्‍या शहरांना 4जी कनेक्टिव्हीटीने जोडण्याची योजना आहे. मुंबई, पुणे, नागपूर, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बंगळूर, हैदराबाद, अहमदाबाद, सुरत, जयपूर, कानपूर, लखनऊ, गाझियाबाद, इंदौर, कोयंम्बतूर, कोची, पटना, कोझीकोट, भोपाळ, त्रिचूर, बडोदा, विशाखापट्टनम, आग्रा, मल्लापूरम या शहरांमध्ये फ्री वायफाय सुविधा सुरू केली जाणार आहे.