आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi Layed Foundation Stone For Nagpur Metro

नागपूर मेट्रोचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन, विदर्भवाद्यांनी दाखवले काळे झेंडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - मौद्याच्या कार्यक्रमातील नरेंद्र मोदींचा फोटो.
नागपूर - मौद्यातील कार्यक्रमापाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपुरात मेट्रोच्या कामाचे भूमिपूजन केले. तसेच सुसज्ज रुग्णालयाचेही भूमिपूजन मोदींनी केले. त्यानंतर कस्तुरचंद पार्क येथे आयोजित सभेत नरेंद्र मोदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. दरम्यान, वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भवाद्यांनी काळे झेंडे दाखवून नरेंद्र मोदी यांचा निषेध केल्याचे वृत्त आहे.

नरेंद्र मोदींनी यावेळी पारडी आणि मानकापूर अशा दोन ठिकाणच्या उड्डाणपुलांच्या कामांचेही भूमिपूजन केले. मोदींनी नागपुरातील भाषणाची सुरुवात मराठीतून करून उपस्थितांचे हृदय जिंकण्याचा प्रयत्न केला. नागपूर हे संत्र्याचे, शून्य मैल ठिकाण असणारे शहर असल्याचे सांगून आपलेपणाची जाणीवही करुन द्यायला ते विसरले नाहीत. आघाडी सरकारने कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याने आघाडी सरकारचा एकही प्रतिनिधीही या कार्यक्रमाला उपस्थित नव्हता.
देशवासीयांनी मोठ्या धैर्याने ब्रिटीशांना देश सोडण्यास भाग पाडले होते, त्याचप्रमाणे आता गरीबीलाही पळवून लावण्याचा निर्धार करण्याची गरज मोदींनी व्यक्त केली. शहरीकरण ही संधी आहे. आर्थिक विकासाच्या दृष्टीने अनेक संधींची निर्मिती शहरीकरणाच्या माध्यमातून शक्य असते, असेही मोदी म्हणाले. शहरांचा विकास होणे अत्यंत गरजेचे आहे आणि त्यासाठी मेट्रोसारख्या योजना हातभार लावतील असे मोदी म्हणाले.
पर्यावरणाचे संरक्षण ही सार्वजनिक जबाबदारी आहे. त्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवे असेही मोदी म्हणाले. मौद्यातील कार्यक्रम आणि त्याआधी रांचीत झालेल्या कार्यक्रमात केलेल्या भाषणातील ब-याच मुद्यांचा पुनरुच्चार मोदींनी नागपूर येथील भाषणात केला.