आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi News In Marathi, Cotton, Sharad Pawar, Farmer Suicide

कापसासाठी मोदी यांची पंचसूत्री, तर शेतक-यांच्या आत्महत्यांवर पवारांना जाब

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्धा - भाजपचे सरकार सत्तेत आल्यास कापूस उत्पादक शेतक-यांसाठी ‘फाइव्ह एफ’फॉर्म्युला अमलात आणला जाईल, अशी ग्वाही देतानाच पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सरकारच्या मदत पॅकेज धोरणावर हल्ला चढवला. पॅकेज ही फॅशनच झाल्याची टीका करून शेतकरी आत्महत्येस का प्रवृत्त होत आहेत, याचे उत्तर शरद पवार यांनी द्यावे, असे आव्हानही मोदी यांनी दिले.


स्वावलंबी विद्यालयाच्या मैदानावर झालेल्या जनचेतना सभेत मोदींनी ‘शेतक-यांचे दु:ख जाणून घेण्यासाठी आलो आहे’, असे मराठीतून भाषण सुरू केले. दोन वर्षांपूर्वी कापसाला भाव मिळत होता. पण निर्यातबंदीमुळे कोट्यवधींचे नुकसान झाले. शेतक-यांना पैसे मिळत असतील तर निर्यातबंदी व मांस निर्यातीला सबसिडी दिली जाते, असे मोदी म्हणाले.


नदीजोड, सूक्ष्म सिंचनावर भर : शेतक-यांसाठी स्वतंत्र धोरणाची गरज आहे. नदीजोड प्रकल्प राबवल्यास सिंचनासाठी पाणी मिळू शकते. ड्रीप, स्प्रिंकलर अशा सुविधा शेतीत असाव्यात, असे मोदी म्हणाले.
शेतमालासाठी रेल्वे असावी : दगड, कापड नेण्यासाठी रेल्वे मिळते. शेतीमाल वाहतुकीसाठी रेल्वे असावी. कृषी आधारित उद्योगांना चालना दिली जावी.
वॉटर क्रेडिट संकल्पनेची गरज : पाणी बचाव अभियान राबवावे. वॉटर क्रेडिट संकल्पना विकसित करून पाणी बचतीसाठी योजनांचा लाभ व क्रेडिट दिले पाहिजे. बांधावर सागाची लागवड करावी.


‘फाइव्ह एफ’ फॉर्म्युला
‘फार्म, फायबर, फॅब्रिक, फॅशन, फॉरेन’ या पंचसूत्रीतून धागा तेथे कापड तयार व्हावे, कापड व रेडिमेडही तयार होऊन ते निर्यात केले जावे, असे सांगून नवी पिढी शेतीपासून दूर राहत आहे. असेच चालत राहिले तर विदेशातून अन्नधान्य आयात करण्याची वेळ येईल व बेहाल होतील, असा इशाराही मोदींनी दिला.