आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi News In Marathi, Prime Minister, Divya Marathi

नागपुरात जाणवलाच नाही मोदी फीव्हर, भाषण आक्रमक नसल्याने जनतेचा अपेक्षाभंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - पंतप्रधाननरेंद्र मोदी काय बोलणार, याविषयी जनमानसात उत्सुकता आ णि उत्साहाचे वातावरण असते. श्रोत्यांशी थेट संवाद साधत मोदी सभेचा ताबा घेतात, जनसमुदायास आपलेसे करण्याचा प्रयत्न करतात. ‘मोदी... मोदी’च्या घोषणा होतात. गुरुवारी नागपुरातील कस्तुरचंद पार्कवरील जाहीर सभेत मात्र या फीव्हरचा अभाव होता. सभेसाठी आलेल्या लोकांमध्ये फारसा उत्साह नसल्याचे स्पष्टपणे जाणवत होते.

मुख्यमंत्र्यांसह आघाडीच्या मंत्र्यांनी घातलेल्या बहिष्काराची छाया मोदींच्या कार्यक्रमावर पसरली होती. त्यामुळे या विषयाचीच चर्चा लोकांमध्ये अधिक होती. कार्यक्रमापूर्वी नागपुरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे कार्यक्रमावरच प्रश्नचिन्ह लागले होते. मोदींच्या उपस्थितीत भूिमपूजनाचा कार्यक्रम होणार असल्याने लाखाची गर्दी जमेल, हा भाजप नेत्यांना वाटत असलेला आत्मविश्वास जमलेल्या जेमतेम गर्दीने फोल ठरवला. मोदी भाषणाला उभे झाल्यावर होणाऱ्या ‘मोदी..मोदी’च्या घोषणा अभावानेच ऐकायला िमळाल्या.
मराठीतून भाषणाला सुरुवात करून मोदींनी वातावरण िनर्मितीचा प्रयत्न केला. मात्र, त्याला लोकांकडून अपेिक्षत प्रतिसाद िमळू शकला नाही. भ्रष्टाचार, वाढते शहरीकरण, स्वच्छतेच्या मुद्द्यावर मोदींनी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यालाही अपेिक्षत प्रतिसाद मिळत नसल्याचे सातत्याने जाणवत होते. िनवडणुकीची सभा नसल्याने त्यांच्या भाषणाला पुरेशी धार नव्हती, अशी प्रतिक्रिया सभेनंतर लोकांकडून ऐकायला िमळत होती.

बहिष्काराचा विषय भाषणात टाळला
मोदींनीभाषणात मांडलेले मुद्दे योग्य असले, तरी मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमावर घातलेला बहिष्कार, वेगळ्या विदर्भाचा मुद्दा आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रश्नावर माेदी बोलणे अपेिक्षत होते. मात्र, त्यांनी नागपुरातील भाषणात यापैकी कुठलाही विषय हाताळला नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत होते. आक्रमक भाषणासाठी प्रसिद्ध असलेल्या मोदींमध्ये अाज पूर्वीची आक्रमकता िदसली नाही, असे मत सभेवरून परतणाऱ्या तरुण मंडळींमध्ये व्यक्त होत होते.