आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi News In Marathi, Prime Minister, Divya Marathi, Nagpur

भ्रष्टाचारमुक्तीचा लढा महाराष्ट्रातून सुरू करा, नागपुरात पंतप्रधान नरेंद्र मोदींची हाक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रातून दिलेला स्वराज्य हा माझा जन्मसिध्‍द हक्क असल्याचा नारा देशभर पोहोचला. महाराष्ट्रामध्ये ती ताकद होती. भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढ्याची सुरुवातदेखील महाराष्ट्रपासून सुरू व्हावी. त्यासाठी मला तुमची साथ हवी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौदा आणि नागपूर येथे केले.
मागील साठ वर्षांत या देशाची लूटच झाली.
केवळ राजकीय नेत्यांनी नाही तर संधी मिळाली त्यांनीही देशाची लूट केली. मी भ्रष्टाचारावर बोलणे सुरू केल्याने काही राजकीय पक्ष अस्वस्थ झाले आहेत. पण मी त्यांना खुश करण्यासाठी काम करणार नाही तर भ्रष्टाचारमुक्तीसाठी काम करणार आहे. भ्रष्टाचाराचा आजार या देशातून घालवायलाच हवा, असेही ते म्हणाले.

नागपुरात मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे भूमिपूजन तसेच मौदा येथे एनटीपीसीच्या वीज प्रकल्पाच्या लोकार्पण समारंभात मोदी बोलत होते. राज्यपाल के. शंकरनारायणन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आदी या वेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

चव्हाणांनी मोदींना टाळले : नागपुरात मोदींसोबतच्या कार्यक्रमात लोकांकडून टर उडवली जाण्याच्या भीतीने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या कार्यक्रमाला आलेच नाहीत. त्यांनी बुधवारीच तशी घोषणा केली होती. शनवि ारी मोदींच्या उपस्थितीतील एका कार्यक्रमात त्यांना मध्येच भाषण थांबवावे लागले होते. चव्हाण यांच्या अनुपस्थितीचा उल्लेख संससदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू यांनी केला. मुख्यमंत्र्यांची गैरहजेरी जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले.
1 . आमच्या पूर्वी स्वतंत्र झालेले छोटे देश प्रगतीत पुढे गेले. वि कासात आम्ही मागे पडलो. देश स्वत:च्या ताकदीने स्वतंत्र झाला. इंग्रजांना आम्ही हकल ून लावले. १२५
कोटी जनता एकत्र आल्या स आम्ही देशातील गरिबीही हटवू शकतो. त्या साठी वि श्वा स निर् माण व्हा वा.
2. देशात वाढत्या शहरीक रणाला आजवर समस्या मानले गेले. मात्र, शहरीक रणाला मी वि कासाची संधी मानतो. शहरांच्या वि कासाचे नियोजन न झाल्या ने व्यवस्था
कोलमडल्या . त्या वर मात करण्या साठी वि कासाची नवी ब्ल्यू प्रिंट तयार करावी लागेल.
3. निवडक ५०० शहरांत पीपीपीतून जलशुद्धीकरण, िसंचन, घनकचरा निर्मूलनातून वीजनिर्मि तीची योजना आहे. अनेक देशांमध्ये लोक कुठेही घाण करताना दिसत नाही. आमच्या वि दर्भा त तसे आहे काय? सर्वांनी स्वच्छतेचा संस्कार आत्मसात करण्या ची गरज आहे.

* प्रश्न
निवडणुका तेथेच हुल्लडबाजी का?
ज्या तीन राज्यां च्या मुख्यमंत्र्यांची टर उडवली गेली , तेथे विधानसभा निवडणुका होत आहेत. राजकीय फायद्यासाठी विरोधी मुख्यमंत्र्यांना अपमानित केले जात आहे, असे
काँग्रेस नेते शकील अहमद म्हणाले. तर मुख्यमंत्र्यांच्या अकार्यक्षमतेविरद्ध हा लोकांचा रोष असल्याचे भाजपचे संबिधत पात्रा म्हणाले.

* शंका
हा राजकीय पायंडा तर पडणार नाही ना? काँग्रेस आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमांमध्ये गोंधळ घालू शकते. गुरुवारी नागपुरात मोदींना काळे झेंडे दाखवण्या त आले, ही त्या ची सुरुवात आहे. आमच्या मुख्यमंत्र्यांना अपमानि त करण्याचा प्रयत्न झाला तर जशास तसे उत्तर देऊ, असे प्रदेश काँग्रेसने आधीच स्पष्ट केले होते.

* नागपुरात काँग्रेसने दाखवले काळे झेंडे
मुख्यमंत्र्यांच्या अपमानाच्या निषेधार्थ कॉंग्रेसचे माजी मंत्री अनीस अहमद यांच्या सह कार्यकर्त्यांनी पंतप्रधानांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले. अजनी चौकात युवक काँग्रेसने आंदोलन केले. पोलि सांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. संविधान चौकातही पोलि सांनी आंदोलकांवर सौम्य लाठीमार केला.