आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेवाग्राम भेटीवरुन वाद, मोदी आश्रमात गांधी हत्येचे प्रायश्चित्य करण्यासाठी येणार का?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्धा - मोदींच्या सेवाग्राम आश्रम भेटीवरुन वाद निर्माण झाला आहे. आज (गुरुवार) लोकसभा प्रचारसभेसाठी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी वर्ध्यात येणार आहेत. त्याआधी ते महात्मा गांधींची कर्मभूमी असलेल्या सेवाग्राम आश्रमाला भेट देणार आहेत. मोदींच्या सेवाग्राम भेटीला सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही यांनी आक्षेप घेतला आहे. ज्या विचारधारेने गांधीजींची हत्या केली, त्याचे प्रतिक मोदी आहेत. त्यामुळे त्यांनी भेटीआधी ते गांधी हत्येचे प्रायश्चित्य करण्यासाठी येत आहेत का, हे स्पष्ट करावे, अशी मागणी विद्रोही यांनी केली आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विद्रोही म्हणाले, 'ज्या विचारधारेने गांधीची हत्या केली होती, त्याचे प्रतिक मोदी आहेत. त्यामुळे त्यांनी सेवाग्राममध्ये येऊन त्यांच्या हत्येचे प्रायश्चित्य केले पाहिजे.' त्याच बरोबर आश्रम सर्वांसाठी खुला असल्याचेही ते म्हणाले.
विद्रोहींनी आरोप केला, की मोदी ज्या विचांरांचा प्रचार करीत आहेत, ते गांधीजींच्या विचारांचे शत्रू आहेत. सेवाग्राम हा अहिंसेच्या पुजा-याचा आश्रम आहे. येथे मोदींच्या अंगरक्षकांनी आणि पोलिसांनी येऊ नये. तसेच भाजपच्या प्रचाराचे साहित्य आश्रमात आणू नये.
विद्रोही यांच्या आरोपांवर भाजपकडून काहीही प्रतिक्रिया आलेली नाही. सेवाग्राम आश्रमाचे श्रीराम जाधव यांनी विद्रोहींच्या पवित्र्याशी आश्रमाचा संबंध नसल्याचे म्हटले आहे. आश्रमात येणा-यांचे स्वागत असल्याचे ते म्हणाले.
पुढील स्लाइडमध्ये, सेवाग्राम आश्रमात मोदींना दिले जाणार गांधींजींचे 'मेरे सत्य के प्रयोग'