आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोक गालिब समजतात हेच माझ्यावर मोठे ओझे - नसिरुद्दीन शहा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - लोक मला गालिब समजतात हे माझ्यावरचे सर्वात मोठे ओझे आहे. मी गालिब यांच्यासारखे वागावे, अशी लोकांची अपेक्षा असते. गुलजार गालिबवर चित्रपट करत होते त्यावेळी ते संजीवकुमारला घेणार होते. हे समजल्यावर गुलजार चूक करीत आहेत, असे मला वाटले. ही भूमिका फक्त मीच करू शकतो, असे मी त्यांना पत्र लिहिले. पण ते त्यांना मिळाले नाही. नंतर ही भूमिका मलाच मिळाली. गालिबची भूमिका मीच करीन, मला हवे तेच मानधन घेईन आणि दुसर्‍या कोणाला ही भूमिका करू देणार नाही, असे मी गुलजार साहेबांना सांगितले... अशा भावना प्रसिद्ध अभिनेते नसिरुद्दीन शहा यांनी गुरुवारी नागपुरात व्यक्त केल्या. निमित्त होते त्यांच्या प्रकट मुलाखतीचे. शहा यांनी विविध विषयांवर व्यक्त केलेली मते त्यांच्याच शब्दात...

जगजितसिंग यांचे श्वास ऐकून मी गाण्याशी सिंक्रोनायझेशन करत असे. त्यामुळे मिर्झा गालिब मालिकेतील गाणी मीच गात आहे, असे वाटत असे. महात्मा गांधी, आइनस्टाइन, शिवाजी महाराज, लिनोनार्दो द व्हिंची, बर्नार्ड शॉ अशा अनेक भूमिका मी केल्या. त्या माणसाच्या माध्यमातून लेखक लोकांपर्यंत नेमके काय पोहोचवू शकतो हे समजणे महत्त्वाचे आहे.

गांधी चित्रपटात बेन किंग्जलेची निवड योग्य होती. हा चित्रपट हॉलिवूडचा मोठा प्रोजेक्ट होता. त्यात माझी निवड होणे तसेही शक्य नव्हते. ऑस्कर डोळ्यापुढे ठेवून ‘गांधी’ची निर्मिती करण्यात आली. या चित्रपटात गांधींविषयी नवे काहीच नव्हते. फक्त मिथकावर भर देण्यात आला. कमल हसनच्या एका चित्रपटात मी गांधीजींची भूमिका केली. त्यांनी माझ्यासाठी इतके मेकअप आणले होते की, मी त्यांना म्हटले, हा रोल तूच का करीत नाहीस?. ‘गांधी व्हर्सेस गांधी’ या नाटकाच्या इंग्रजी आवृत्तीत मी काम केले. ती भूमिका छान जमली.

आत्मकथा शंभर टक्के शुगर कोटेड असतात. त्यात सर्वच गोष्टी खर्‍या असतात, असे नाही. पण माझ्या आत्मकथेत सर्वच गोष्टी खर्‍या आहेत. कारण माझ्या चुका पकडल्या गेल्या नाही. लोक आमच्यावर खूप प्रेम करतात, असा फिल्म स्टार्सचा गैरसमज आहे. चित्रपटातील भूमिकेच्या सादरीकरणावर लोक प्रेम करतात.

माझा कधीच वडिलांशी सुसंवाद नव्हता
नॉटी बॉय कंपनीचे जोडे माझे वडील घालत असत. साठ वर्षानंतरही जोडे तसेच आहेत. वडिलांशी माझा सुसंवाद कधीच नव्हता. त्यांचा धाक शेवटपर्यंत राहिला. त्यांच्यात नि माझ्यात जिव्हाळ्याचे नाते राहिले नाही. आता नाटकांमध्ये त्यांचे जोडे, हॅट, लेखणी वापरतो. नव्याण्णव टक्के मेहनत आणि एक टक्का प्रेरणा हाच यशाचा मूलमंत्र आहे.