आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National Arbitration Green Release To Warrant On Collector

राष्ट्रीय हरित लवादाने परभणी, नांदेड जिल्हाधिकाऱ्यांवर वॉरंट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये फ्लोरोसिस आजाराने ग्रस्त असताना शासनाकडून तातडीचे उपाय होत नसल्याबद्धल राष्ट्रीय हरित लवादाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच लवादाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करणाऱ्या चंद्रपूर, हिंगोली, नांदेड व परभणी जिल्हाधिकाऱ्यांविरोधात जामीनपात्र वॉरंट बजावले आहे.
राज्यात फ्लोराइडयुक्त भूजलामुळे २९ जिल्हे प्रभावित आहेत. भूजलात फ्लोराइडचे प्रमाण मर्यादेपक्षा अधिक असतानाच अवैध बोअरवेलच्या माध्यमातून भूजलाचा उपसाही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. परिणामी लोकांमध्ये फ्लोरोसिसचे प्रमाणही वाढत आहे. यामुळे पर्यावरणाचेही अतोनात नुकसान होत असल्याचा दावा करत अॅड. स्मिता सरोदे-सिंगलकर यांनी याचिका दाखल केली होती. लवादाने या प्रकरणी १२ जिल्हाधिकाऱ्यांना उपस्थित राहून उत्तर देण्याचे आदेश दिले होते. मात्र, चार जिल्हाधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने वॉरंट जारी करण्यात आले.