आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीचा दुटप्पीपणा कायम, काँग्रेसला साथ देतानाच विरोधी पक्षनेतेपदावर मात्र दावा कायम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्यांच्या प्रश्नावर सरकारला एकत्रित जाब विचारण्याचा निर्णय काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतला आहे. एकीकडे या विषयावर पुन्हा ‘आघाडी’ झाली असली तरी विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद कोणत्याही परिस्थिती काँग्रेसला न मिळू देण्यासाठी राष्ट्रवादीने जोरदार प्रयत्न कायमच ठेवले आहेत. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे नाव त्यासाठी राष्ट्रवादीने पुढे केले आहे.

विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र लढल्यानंतर दोन्ही काँग्रेसच्या पदरी अपयश आले. त्यानंतर विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने पुन्हा हे दोन्ही मित्रपक्ष एकत्र आल्याचे मंगळवारी दिसून आले. दोन्ही सभागृहांत दोन्ही काँग्रेसच्या आमदारांनी दुष्काळाच्या प्रश्नावर सरकारला एकत्रित जाबही विचारला. चर्चा नको, पॅकेज हवे अशी आक्रमक भूमिका घेत सभागृह दणाणून सोडले.

आबांच्या नावाचा प्रस्ताव
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत विधान सभेतील विरोधी पक्षनेते पदासाठी आर.आर. पाटील यांच्या नावाची विधानसभा अध्यक्षांकडे शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात अध्यक्षांना दिलेल्या पत्रात राष्ट्रवादीने ४५ आमदारांच्या समर्थनाचा दावा केला आहे. यात राष्ट्रवादीचे ४१, शेकापचे तीन व एक अपक्ष आमदाराचा समावेश आहे. आम्ही आमचा दावा सादर केला आहे. निर्णय अध्यक्षांनाच घ्यायचा आहे, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले.

काँग्रेसचा दावाही कायम
काँग्रेसने यापूर्वीच गटनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनाच विरोधी पक्षनेपदावर संधी देण्याची मागणी अध्यक्षांकडे प्रस्ताव देऊन केली आहे. ‘विधानसभेत आमचा पक्ष तिस-या क्रमांकावर असल्याने विरोधी पक्ष नेता आमचाच असेल,’ असा दावा विखे पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बाेलताना केला.