आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nationalist District Chairman Throw Ink On Labour Minister Hasan Mushrif

कामगार मंत्री हसन मुश्रीफांवर राष्‍ट्रवादीच्या जिल्हाध्‍यक्षांनी फेकली शाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - निवेदन देण्याच्या बहाण्याने बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अंगावर व चेह-यावर राष्‍ट्रवादी काँग्रेस अपंग सेलचे जिल्हाध्यक्ष नामदेव डोंगरदिवे यांनी शाई फेकल्याची घटना गुरुवारी येथे घडली. अचानक झालेल्या प्रकारामुळे मुश्रीफ यांच्यासह उपस्थित पदाधिकारी चांगलेच गांगारून गेले.
सुवर्णजयंती राजस्व अभियानांतर्गत विस्तारित समाधान योजनेचा कार्यक्रम येथील जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुलच्या प्रांगणात दुपारी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत येथे आयोजित करण्यात आला होता. या वेळी हसन मुश्रीफ हे आसनावर स्थानापन्न होताच डोंगरदिवे हे मंचावर गेले. त्यांनी मागण्यांचे निवेदन मुश्रीफांना दिले. ते निवेदन वाचत असतानाच डोंगदिवे यांनी त्यांच्या अंगावर व चेह-यावर सोबत आणलेली काळी ऑइल मिश्रित शाई फेकली. त्यानंतर हा प्रकार लक्षात येताच पोलिसांची चांगलीच धांदल उडाली. पोलिसांनी तत्काळ डोंगरदिवे यांना ताब्यात घेतले. दरम्यान, या घटनेच्या काही वेळातच डोंगरदिवे यांच्या राष्‍ट्रवादी काँग्रेसमधून हाकालपट्टी करण्यात आली.
त्याला माफ केले : मुश्रीफ
डोंगरदिवे यांनी आपल्याला निवेदन दिले. त्यानंतर निवेदन वाचत असतानाच अंगावर काही तरी थंड पडल्यासारखे वाटले. सर्व कपडे खराब झाले. परंतु, त्याने असे का केले हे माहीत नाही. मात्र, आपण त्याला माफ केले. त्याने जी काळी शाई टाकली. त्याचे काही डाग आमदार विजयराज शिंदे यांचे कपड्यांवरही पडले.