आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गडचिरोलीत काँग्रेस नेत्याची नक्षलवाद्यांकडून हत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - निमलगुंडम (ता. अहेरी) गावात नक्षल्यांनी कॉँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य व सामाजिक कार्यकर्ते बापू बोंदा तलांडी (वय 50) यांची रविवारी चाकूचे वार करून हत्या केली.
छत्तीसगढमधील सुकमा जिल्हय़ात नक्षल्यांनी केलेल्या हल्ल्यात काँग्रेसचे बडे पुढारी मारले गेले होते. या घटनेला 25 मे रोजी एक वर्ष पूर्ण झाले. याच दिवशी नक्षलींनी तलांडी यांचीही हत्या केली. तलांडी हे यापूर्वी ते तीनदा विधानसभेच्या निवडणुका लढले होते.

रविवारी सकाळी बापू तलांडी दुचाकीने गडचिरोलीकडे जात होते. घरापासून 300 मीटर दूर येताच नक्षल्यांनी तलांडी यांची गाडी थांबवली व चाकूने सपासप वार केले. त्या नंतरही तलांडी जीव वाचविण्यासाठी तेथून पळाले. पण थोड्या अंतरावर जाऊन कोसळले व जागीच गतप्राण झाले. या घटनेनंतर नक्षली काही पत्रके फेकून निघून गेले. ‘20 वर्षांपासून तू या भागात फिरत आहेस. पण आता कुत्र्याच्या मौतीने मरशील’ असा मजकूर पत्रकात लिहिला आहे.