आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘लोकायत’च्या माध्यमातून नक्षलवाद्यांचा म्होरक्या परेरा सक्रिय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- नक्षलवाद्यांचा म्होरक्या अरुण परेरा पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. ‘लोकायत’ या नावाने नवीन फ्रंट स्थापन करून त्या माध्यमातून तो जनमत मिळवून नक्षल चळवळ आणखी प्रभावी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे कळते.
महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत नक्षल चळवळ मोठ्या वेगाने फोफावत आहे. गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या भागापुरत्याच सीमित असलेल्या नक्षली कारवाया आता राज्यभर पसरल्या आहेत. 48 फ्रंट सध्या राज्यभरात सक्रिय आहेत. या माध्यमातून नक्षलवादी चळवळीला जास्तीत जास्त रसद मिळवण्याचे काम सुरू आहे. सध्या मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात अशा फ्रंट अधिक सक्रिय आहेत.

प्राप्त माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी अरुण परेराने मुंबईतील शारदाश्रम या शाळेत मुंबई मराठी ग्रंथ प्रकाशन या नावाने एक कार्यक्रमही घेतला. या कार्यक्रमाला मुंबईच्या विविध भागांत काम करणारे कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम पूर्णपणे नक्षल चळवळीच्या प्रसारासाठी होता. या कार्यक्रमात कोणत्याही पुस्तकाचे प्रकाशन झाले नाही, हे विशेष. ही एक बैठकच होती, अशी माहिती नक्षलविरोधी अभियानच्या उच्चाधिकार्‍यांनी सांगितले. गेल्या जून महिन्यात परेराने पुणे येथे ‘लोकायत’ या बॅनरखाली बैठक घेतली. त्यावेळीच त्याच्या हालचालींबद्दल पोलिसांना संशय आला.


लोकशाहीचा प्रभावी वापर
गेल्या काही दिवसांपासून अरुण परेरासारख्या नक्षल चळवळीचे नेते भाषण व साहित्य लेखनात लोकशाही शब्दाचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत. व्यवस्थेत राहूनच ती उलथवून टाकणे आणि सर्वसामान्यांना अपेक्षित अशी नवी व्यवस्था निर्माण करण्याचा विचार ते व्यक्त करत आहेत.